Home टॉप स्टोरी जम्मू-काश्मीर, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

जम्मू-काश्मीर, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

0

जम्मू- काश्मिर व झारखंड विधानसभा निवडणूक २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यांत होणार असून २३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. या संवेदनशील राज्यांमध्ये पाच टप्प्यात मतदान होणार असून २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी दोन्ही राज्यांच्या निवडणुकीची घोषणा केली.

२५ नोव्हेंबर, २, ९, १४ आणि २० डिसेंबर रोजी या दोन्ही राज्यांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी २३ डिसेंबर रोजी होईल, असे संपथ यांनी सांगितले. त्याचबरोबर विधानसभेच्या तीन जागांसाठी २५ नोव्हेंबरला पोटनिवडणूकही घेण्यात येईल.

जम्मू-काश्मीरच्या सहा वर्षाच्या विधानसभेची मुदत १६ जानेवारी रोजी संपत आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ८७ जागा आहेत. त्यापैकी सात जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

या राज्यात ७२.२५ लाख मतदार असून १००२५ मतदान केंद्रे असतील. झारखंडमध्ये ८१ जागा असून सात जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. झारखंडमध्ये २०७.४४ लाख मतदार असून २४,६४८ मतदान केंद्रे असतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version