Home टॉप स्टोरी जम्मू-काश्मीरचा संपर्क तुटला, तुफान बर्फवृष्टी

जम्मू-काश्मीरचा संपर्क तुटला, तुफान बर्फवृष्टी

0

तुफान बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरचा संपर्क तुटला असून हिमाचल प्रदेश व उत्तराखंड नैनीतालमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली.

श्रीनगर, शिमला, नैनीताल- सातत्याने सुरू असलेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरच्या महामार्गावर बर्फाचे डोंगर तयार झाले असून जम्मू-काश्मीरचा इतर राज्यांशी संपर्क तुटला आहे. पर्यटकांचे आवडीचे ठिकाण असलेल्या हिमाचल प्रदेश व उत्तराखंड नैनीतालमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे बर्फाची शुभ्र चादर रस्तोरस्ती पांघरल्याचे चित्र आहे.

शिमला व हिमाचलमधील कन्नुर भागात बर्फवृष्टीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वीज, पाणी आणि टेलिफोन सुविधाही बंद पडल्याने पर्यटकांची प्रचंड कोंडी झाली आहे. शिमलापासून १३ किमीपर्यंत बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची वाहने अडकून पडली आहेत. कुलू मनाली मार्गावरील वाहतूकही पूर्णपणे रखडली असून राज्य परिवहनच्या ३० बसेस ठिकठिकाणी अडकून पडल्या आहेत.

रोहतंग मार्गावर ६० सेटीमीटपर्यंत रस्तोरस्ती बर्फाची चादर अंथरून ठेवल्याची परिस्थिती आहे. थंडीमुळे शिमल्याचा पारा उणे दोन अशांपर्यंत घसरला आहे. बर्फासोबत मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टीही या भागात होत असल्याने सफरचंद उत्पादक शेतक-यांच्या चेह-यावर आनंद झळकत आहे. रबी पिकासाठी हा उत्तम हंगाम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग दुस-या दिवशीही बंद

गेल्या चार दिवसांपासून काश्मीर खो-यात सुरू असलेली बर्फवृष्टी जरादेखील थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे काश्मीरचा देशातील इतर राज्यांशी सलग दुस-या दिवशीही संपर्क तुटला आहे. बर्फवृष्टीमुळे गुलमर्ग भागात ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग भूस्सखलन व बर्फवृष्टीमुळे सलग दुस-या दिवशीही बंद ठेवावा लागला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version