Home Uncategorized जनरल मोटर्सकडून फसवणूक

जनरल मोटर्सकडून फसवणूक

0

 मोटार उत्पादक जनरल मोटार इंडियाकडून सत्य दडवण्यात आल्याचा ठपका सदोष तवेरा प्रकरणी चौकशी करणा-या समितीने ठेवला आहे. 

नवी दिल्ली – मोटार उत्पादक जनरल मोटार इंडियाकडून सत्य दडवण्यात आल्याचा ठपका सदोष तवेरा प्रकरणी चौकशी करणा-या समितीने ठेवला आहे. हा घोटाळा या कंपनीतील वरिष्ठ अधिका-यांसमोर घडल्याचे ताशेरेही या समितीने ओढले आहेत. 

जुलैमध्ये १.१४ लाख तवेरा मोटारी उत्सर्जन प्रणालीतील दोषामुळे माघारी घेण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तीनसदस्यीय चौकशी समितीने रस्ते खात्याला आपला अहवाल सादर केला आहे. उत्पादन व्यवस्थापनाच्या चाचणीवेळी निकष पूर्ण करणा-या विशिष्ट मोटारीच सादर करण्यात आल्या.

गेल्या सात वर्षापासून ही फसवणूक होत होती, असे या अहवालात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. रस्ते खात्याच्या अधिका-याने हा अहवाल मिळाल्याला दुजोरा दिला आहे. मात्र जनरल मोटर्स इंडियाचे उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी या अहवालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version