Home क्रीडा जगज्जेता बनण्यासाठी कार्लसनचे वय योग्य

जगज्जेता बनण्यासाठी कार्लसनचे वय योग्य

0

जगज्जेता बनण्यासाठी मॅग्नस कार्लसनचे (२२ वर्षे) हेच योग्य वय आहे, असे मत माजी जगज्जेता रशियाचे अनातोली कॉरपॉव्ह यांनी व्यक्त केले. 

‘‘कार्लसन आणि आनंद यांच्यातील जगज्जेतेपदाच्या लढतीची प्रतीक्षा जगभरातील बुद्धिबळप्रेमींना आहे. कारण सध्या हे दोघे जगातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटूंपैकी एक आहेत. कार्लसनने बुद्धिबळाच्या आतापर्यंतच्या छोटया कारकीर्दीत उत्तुंग यश मिळवून दाखवले आहे. त्याचे वय अजून खूप लहान आहे. ते पाहता इतक्या कमी वयात तो जगज्जेता ठरला तर त्याच्या बुद्धिबळ कारकीर्दीतील ते सर्वात मोठे यश ठरेल. याउलट आनंद हा अनुभवी असून याआधी अनेक वेळा जगज्जेता ठरला आहे. तो वयाच्या १६व्या वर्षापासून बुद्धिबळ जगतात त्याचा दबदबा राखून आहे. आपण आनंदला तो १६ वर्षाचाच असताना प्रथम पाहिले होते. आता तो कार्लसनविरुद्ध अनुभवाचा पुरेपूर वापर करून खेळेल यात शंका नाही. आनंदवर मात करणे कार्लसनसाठी सोपे नसले तरी त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे,’’ याकडे कॉरपॉव्ह यांनी लक्ष वेधले.

माझ्या वेळी जगज्जेतेपदाची लढत सरासरी ७० दिवस चालायची, असे कॉरपॉव्ह सांगतात. ‘‘आपण जगज्जेतेपदाच्या ११ लढतींमध्ये खेळलो आहोत. त्यावेळी एक लढत जवळपास ७० दिवस चालायची. आता २० दिवसांत जगज्जेतेपदाची लढत संपते. मात्र कमी दिवसांमुळे प्रत्येक मिनिट बुद्धिबळपटूंसाठी महत्त्वाचे असते. एका फेरीत पराभव झाला तर त्यातून सावरण्यासाठी त्यांना फार कमी वेळ मिळतो. ते पाहता बुद्धिबळपटू मानसिकदृष्टया कणखर असणे गरजेचे आहे,’’ असे कॉरपॉव्ह यांनी सांगितले. कॉरपॉव्ह यांनी १९९८मध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत रॅपिड प्ले ऑफच्या आधारावर आनंदवर मात केली होती. आनंद आणि इस्रयलचा बोरिस गेलफॅँड यांच्यात गेल्या वर्षी झालेली जगज्जेतेपदाची लढत ही सर्वात कंटाळवाणी होती, असेही कॉरपॉव्ह यांनी म्हटले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version