Home देश छत्तीसगडमध्ये विशेष सुरक्षेची काँग्रेसची मागणी

छत्तीसगडमध्ये विशेष सुरक्षेची काँग्रेसची मागणी

0

छत्तीसगड विधानसभा निवडणूकीच्या काळात मतदान केंद्रावर विशेष सुरक्षा पुरवण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला केली आहे.

नवी दिल्ली – छत्तीसगड विधानसभा निवडणूकीच्या काळात नक्षलवादी भागातील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही तसेच विशेष सुरक्षा पुरवण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला केली आहे. काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची विनंती आयोगाकडे केली आहे.

छत्तीसड विधानसभेच्या ९० जागांसाठीची निवडणूक ऑक्टोबर २०१३ ला होण्याची शक्यता आहे. मात्र त्याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, छत्तीसगडमधील बातसर भागात २५ मे ला नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केला होता. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा यांच्यासह २७ जण ठार झाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version