Home महाराष्ट्र कोकण चिपळूणचा पारा ४० अंशांवर

चिपळूणचा पारा ४० अंशांवर

0

एप्रिल महिना संपत असतानाच उन्हाने कहर केला आहे. चिपळुणचा पारा ४० अंशांवर गेल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

चिपळूण- एप्रिल महिना संपत असतानाच उन्हाने कहर केला आहे. चिपळुणचा पारा ४० अंशांवर गेल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

या वर्षी तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांत ४० ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढला आहे. चिपळूण शहरातदेखील गेले काही दिवस ३६ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

वाढत्या उन्हातून थोडासा थंडावा मिळावा, यासाठी थंडपेय, आईस्क्रीम, कलिंगड याचा आधार घेण्यात येत आहे. एसटी स्टँड, रेल्वे स्थानक आणि बाजारपेठांत थंडपेये आणि बाटलीबंद पाण्याला मोठी मागणी आहे.

उन्हापासून वाचण्यासाठी महिला स्कार्फ, अ‍ॅप्रन आणि पुरुष टोपीचा वापर करत आहेत. चिपळुणमध्ये तीनही ऋतू तीव्रतेने जाणवतात. पावसाळ्यात पूर येतो. कडाक्याची थंडीदेखील पडते आणि उन्हाळ्यात वाढत्या उकाडय़ामुळे हैराण व्हायला होते. याचा अनुभव येथील नागरिक घेत असून या वर्षी तर तापमानान उच्चांक गाठला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version