Home महामुंबई चिठ्ठी लिहून बॉलिवूड डान्सरची आत्महत्या

चिठ्ठी लिहून बॉलिवूड डान्सरची आत्महत्या

0

खात्यातील पैसे मुलीला देण्याची आर्त विनंती

मुंबई – बॉलिवूडमधील अनेक सिनेमात डान्स केलेल्या डान्सरने आत्महत्या केली आहे. अभिजीत शिंदे असे या ३२ वर्षीय डान्सरचे नाव आहे. अभिजीतने बुधवारी भांडुपमधील राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

अभिजीतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या सुसाईड नोटमधील तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र कौटुंबिक तणाव, आर्थिक चणचण आणि काही दिवसांपासून काम न मिळाल्याने, अभिजीतने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या आत्महत्येची नोंद भांडुप पोलिसात झाली आहे. दरम्यान, अभिजीतच्या कुटुंबात सध्या तणाव होता. त्याची पत्नी तीन महिन्यांपासून त्याच्यासोबत राहत नव्हती. अभिजीतला दोन वर्षाची मुलगी आहे.

मात्र पत्नी अभिजीतला मुलीला भेटू देत नव्हती. त्यामुळे अभिजीत तणावात होता, असं पोलिसांनी सांगितले. या तणावातून अभिजीतने बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आयुष्य संपवले. अभिजीत राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे काही शेजा-यांनी चौकशी केली असता, अभिजीतने गळफास घेतल्याचे समोर आले. शेजा-यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अभिजीतला रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभिजीतजवळ जी सुसाईड नोट आढळली आहे, त्यात त्याने आपल्या बँक खात्यातील पैसे मुलीला द्या, असे म्हटले आहे.

दिग्गजांसोबत काम
दरम्यान, अभिजीतने बॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. रणबीर कपूर, रणवीर सिंह यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत. बॉलिवूडमधील सहकलाकार असो किंवा अभिजीतसारखे डान्सर असो, अशा कलाकारांचा संघर्ष, स्ट्रगल हा लपून राहिलेला नाही. कामाच ताण असो वा कौटुंबिक तणाव, विविध कारणांनी अनेक कलाकारांनी आयुष्य संपवले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version