Home टॉप स्टोरी चार पैकी एका मुंबईकराला गॅस सबसिडी नको

चार पैकी एका मुंबईकराला गॅस सबसिडी नको

0

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीमंतांना गॅस सबसिडी घेऊ नका असे आवाहन केले होते. मोदींच्या या आव्हानाला मुंबईकर चांगला प्रतिसाद देत आहेत.

मुंबई – काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीमंतांना गॅस सबसिडी घेऊ नका असे आवाहन केले होते. मोदींच्या या आव्हानाला मुंबईकर चांगला प्रतिसाद देत आहेत. चार पैकी एक मुंबईकर गॅस सबसिडी नाकारत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

३१ मार्चपर्यंत झालेल्या नोंदणीत मुंबईतील सहा लाख लोकांनी एलपीजी सबसिडी नाकारली आहे.

अनेक कंपन्या आपल्या कर्मचा-यांना सबसिडी न घेण्याचे आवाहन करत आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ऑईल मार्केटिंग कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. एक एप्रिलपर्यंत राज्यातील ७६.७ टक्के नागरिकांनी एलपीजी सबसिडी घेतल्याचे अधिका-याने सांगितले.

मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांना जाहिरातींच्या माध्यमातून सबसिडी न घेण्याचे आवाहन करत आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत की आम्हाला २३ टक्के प्रतिसाद मिळाला आहे असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. तसेच ज्यांनी सबसिडीसाठी नोंदणी केली आहे मात्र त्यांची प्रक्रिया पूर्ण न झालेल्यांना जूनपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

सबसिडी न घेण्याच्या आव्हानाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे असे बीपीसीएलच्या अधिका-यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version