Home टॉप स्टोरी चार जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन

चार जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन

0

संसदेचे विशेष अधिवेशन चार ते बारा जून दरम्यान घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

नवी दिल्ली- संसदेचे विशेष अधिवेशन चार ते बारा जून दरम्यान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी सकाळी दिल्लीत दुसरी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सोळाव्या लोकसभेचे पहिलेच विशेष अधिवेशन होणार असल्याने यात लोकसभा अध्यक्ष निवड आणि नवनियुक्त सदस्यांना शपथ दिली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ आणि ५ तारखेला नवनियुक्त सदस्यांना शपथ दिली जाणार असून सहा जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यानंतर संसदेच्या दोन्ही सदनात नऊ जून रोजी राष्ट्रपती संबोधित करतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version