Home Uncategorized चढ-उतारांच्या हिंदोळयावर सेन्सेक्स

चढ-उतारांच्या हिंदोळयावर सेन्सेक्स

0

ब्लूचिप कंपन्यांच्या खरेदी-विक्रीमुळे शुक्रवारी सकाळच्या सत्रात १५० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स सरतेशेवटी केवळ १४ अंकांच्या वाढीसह १९,९१५.९५ वर बंद झाला. 

मुंबई- ब्लूचिप कंपन्यांच्या खरेदी-विक्रीमुळे शुक्रवारी सकाळच्या सत्रात १५० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स सरतेशेवटी केवळ १४ अंकांच्या वाढीसह १९,९१५.९५ वर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकात मात्र २.४० अंकांची घट झाली आणि निर्देशांक ५,९०७.३० वर बंद झाला.

रिलायन्स, टाटा मोटर्स, आयटीसी यांसारख्या शेअर्सची खरेदी झाल्याने सेन्सेक्स चांगलाच वधारला होता. मात्र आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस या शेअर्सची विक्री झाल्याने निर्देशांकाची घसरगुंडी उडाली. वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी सरकारी बँकांना अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून दिल्याचा सकारात्मक परिणाम या क्षेत्रातील शेअरवर झाला. 

मोटारसायकल उत्पादक टीव्हीएस मोटर्सच्या शेअरमध्ये ८.८१ टक्क्यांची वाढ झाली. तसेच टाटा मोटर्स १.४४ टक्के, मारुती सुझुकी १.१० टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये ०.९३ टक्क्यांनी वाढ झाली. तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंमधील पी. सी. ज्वेलर्स ४.१९ टक्के, टायटन ०.३५ टक्के, टीटीके प्रेस्टिज ०.३५ टक्क्यांनी वधारले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version