Home महाराष्ट्र कोकण ग्रामीण भागात मुलींची आघाडी

ग्रामीण भागात मुलींची आघाडी

0

रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडच्या शिवेवर असलेल्या भेलोशी विद्यालयापर्यंत मैलोनमैलाचा प्रवास करून ग्रामीण भागातील मुलींनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

महाड – रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडच्या शिवेवर असलेल्या भेलोशी विद्यालयापर्यंत मैलोनमैलाचा प्रवास करून ग्रामीण भागातील मुलींनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. लाल डब्याच्या एसटीची कधी वेळ चुकली तर पायाला थिट्टे पडेपर्यंत प्रवास करत (कुडुक, बौद्धवाडी) येथील तृप्ती दीपक खरे हिने भेलोशी माध्यमिक विद्यालयातून ८५.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

निकालाची यशस्वी परंपरा राखत सर्वाधिक विद्यार्थी उर्तीण झालेल्या भेलोशी विद्यालयाचा यंदा ९३ टक्के इतका निकाल लागला आहे. याच शाळेची विद्यार्थिनी अस्मिता मिलिंद साळवी (रा. कुडुक) हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ६६ टक्के गुण संपादन केले. तर लाडवली येथील नवयुग विद्यापीठातून नितिशा बबन गायकवाड (रा. आसनपोई, बिरवाडी) हिने ७८ टक्के गुण संपादन करून यश मिळवले.

नागोठेणेत भारती एज्युकेशनने ९ वर्षाची परंपरा राखली
नागोठणे येथील भारती एज्युकेशनने सलग नवव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. तसेच सोसायटीच्या एस. डी. परमार इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले. या शाळेतील सिमरन जैन ८८.१८ टक्के, पायल मोदी ८५.६४ टक्के आणि संदेश धामणे ८४.९४ टक्के गुण मिळवले.

उरण तालुक्याचा ७७.९८ टक्के निकाल
उरण तालुक्याचा ७७.९८ टक्के इतका निकाल लागला आहे. तालुक्यातून २१८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १९१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सेंट मेरी हायस्कूल ९७.५४, सिटिझन हायस्कूल ९१.४३, उरण एज्युकेशन सोसायटी (इंग्रजी माध्यम) ९४.५९, रोटरी इंग्लिश प्रीमियर स्कूल ९४.३४, न्यू इंग्लिश स्कूल, मोरा ५७.५३ आणि द्रोणागिरी हायस्कूल (करंजा) शाळेचा ६९.६० टक्के निकाल लागला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version