Home देश गुजरातमध्ये तीन ठिकाणी फेरनिवडणूक

गुजरातमध्ये तीन ठिकाणी फेरनिवडणूक

0

निवडणूक आयोगाने  दिलेल्या सुचनेनुसार गुजरातमधील तीन मतदान केंद्रावर रविवारी फेरमतदान करण्यात आले.

अहमदाबाद – निवडणूक आयोगाने  दिलेल्या सुचनेनुसार गुजरातमधील तीन मतदान केंद्रावर रविवारी फेरमतदान करण्यात आले. त्यानुसार जमीधोरपूर विधानसभा अंतर्गत येणा-या कोटधा येथे दुपारी एक वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान करणअयात आले. सुरत उत्तर विधानसभेतंर्गत असलेल्या कटारगम येथील मतदान केंद्र २७ मध्ये ४९ टक्के तर भावनगर ग्रामीण विधानसभेतंर्गत येणा-या कामलेज येथील मतदान केंद्र ६९ मध्ये ४० टक्के मतदान पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अशोक मानेक यांनी दिली आहे.

१३ डिसेंबरला पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान इलेट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने या भागात फेरनिवडणूक घ्यावी लागली आहे. भावनगर ग्रामीण विधानसभेत भाजपचे पुरुषोत्तम सोनाकी आणि काँग्रेसचे शक्तीसिंग गोईल एकमेकांच्या विरुद्ध रिंगणात उभे आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version