Home महाराष्ट्र कोकण खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा

खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा

0

वरवडे येथे मोफत चष्मा वाटप; मुलांना खाऊ वाटप, देवगड येथे भजन स्पर्धा तर कुडाळ येथे नाटय़स्पर्धेची रंगत

कणकवली – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमान पक्षातर्फे शाळकरी मुलांना खाऊ वाटप, रुग्णांना फळे वाटप तसेच वरवडे येथे नेत्रतपासणी करून मोफत चष्मा वाटप करण्यात आले. कुडाळ येथे नाटय़ स्पर्धा आणि देवगड येथे भजन स्पर्धा आयोजित करून कार्यकर्ते, चाहत्यांनी नारायण राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

कणकवली वरवडे येथे नारायण राणे यांच्या गावी सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ३०० हून जास्त लाभार्थ्यांची तपासणी करून मोफत चष्मा वाटप करण्यात आले. ‘‘नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद पक्षनेते नारायण राणे ठेवतात. असेच सामाजिक उपक्रम व्हावेत, अशी त्यांची इच्छा असते, असे मत महिला आणि बालक ल्याण सभापती सायली सावंत आणि स्वाभिमान पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांनी व्यक्त केले.

यावेळी पं. स. सभापती भाग्यलक्ष्मी साटम उपस्थित होत्या. ‘‘सोनू सावंत यांच्या कार्याची पक्षश्रेष्ठींकडून निश्चितच दखल घेतली जाईल. त्यांचे कार्य सामाजिक भावनेतून आहे. याचा आदर्श अन्य कार्यकर्त्यांनी घ्यावा,’’ असे आवाहन त्यांनी केले. लोकोपयोगी कार्य के ल्यास आत्मिक समाधान लाभते. तसेच जनतेचे आशीर्वाद मिळतात. हीच आपली ताकद आहे. असे प्रतिपादन सोनू सावंत यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाळे, पं. स. सदस्य राधिका सावंत, सरपंच भाई बांदल, उपसरपंच अमोल बोंद्रे, डॉ. ए. ए. चोपडे, प्रदीप राणे, महेंद्र सांब्रेकर, महेश गुरव, गोपी लाड, बच्चु प्रभुगावकर यांच्यासह तालुकाध्यक्षा स्वाती राणे, विभागीय अध्यक्ष संतोष चव्हाण, पिसेकामते सरपंच श्री. राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, वरवडे स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने फणसवाडी वरवडे शाळा नं. १ आणि हिवाळे शाळा येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्र माला अप्पा सावंत, काका मालंडकर, सुभाष मालंडकर, अनंत घाडीगावकर, शिवा सादये, भाई सादये, सुभाष वरवडेकर, मागासवर्गीय सेलचे वरवडेकर, अमोल घाडीगावकर, किशोर मेस्त्री, बाबू वारंग, संजय कु येसकर, इब्राहिम शेख, उत्तम कडुलकर, राजू फर्नाडिस, काना फर्नाडिस, गणेश कडुलकर आदी उपस्थित होते.

देवगड येथे भजनस्पर्धा तर कुडाळ येथे नाटय़स्पर्धेने वाढदिवसाच्या कार्यक्रमाची रंगत वाढली होती. त्याशिवाय गावागावात वाढदिवसाचे औचित्य साधून धान्य वाटप, फळवाटप काही ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version