Home महाराष्ट्र कोकण मेवा खारेपाटणमध्ये लोककला महोत्सव

खारेपाटणमध्ये लोककला महोत्सव

0

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येथील कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाबरोबर लोकक ला महोत्सव साजरा होणार आहे.

खारेपाटण – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येथील कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाबरोबर लोकक ला महोत्सव साजरा होणार आहे. सूर्यनारायण मूर्तीसमोर दीपोत्सव व मशाल मिरवणूक काढून लोकपाल विधेयकाचे स्वागत व सर्वाना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होणार आहे. गेली ३४ वर्षे विविध स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, महिलांसाठी होम मिनिस्टर, ज्येष्ठ नागरिकांसाठी वैविध्यपूर्ण स्पर्धा, महिला भजन, वारकरी दिंडी, दीपोत्सव आदी कार्यक्रम या वेळी सादर होणार आहेत. तसेच रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.

खारेपाटण दशक्रोशीतील हजारो नागरिक नववर्षानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी कपिलेश्वर मंदिराजवळ मोठय़ा संख्येने जमतात. या कार्यक्रमाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच रिहाना काझी, उपसरपंच संदेश धुमाळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच चिंचवली वायंगणी, नडगिवे, कुरगवणे, शेर्पे, वारगांव, शिडवणे, साळिस्ते गावाचे सरपंच आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

खारेपाटण कॉलेजात २९ ते ३० डिसेंबर रोजी स्नेहसंमेलन. दिनांक ३० रोजी वीर शंकरराव पेंढारकर यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त मैदानावर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील चाकरमानी मोठय़ा संख्येने या तीनदिवसीय सोहळ्यात सहभागी होतात. या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन कपिलेश्वर प्रासादिक मंडळ करीत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version