कोडी

0

कोडी बुद्धीला खुराक देण्यासाठी असतात. अनेकदा सोपी-सोपी कोडी आपल्याला अवघड वाटतात. पण, ती सोडवल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असतो. अनेकांना एखादी गोष्ट सांगताना वेगळ्या प्रकारे सांगण्याचा छंद असतो. अशावेळी आपण कोडय़ात बोलू नका, असे बोलतो. कोडी सोडवण्यासाठी खरोखरच बुद्धीचा कस लागतो. असेच काही कोडी सांगणारे सोडवणारे ‘पैचान कौन?’, ‘कोडी झाली नाटुकली’ ही ज्योती कपिले यांची दोन छान पुस्तके बाजारात आलेली आहेत.

पैचान कौन? या पुस्तकात अनेक कोडी आहेत. त्यासोबतच काही चित्रे आहेत. ती लहान मुलांनी रंगवायची आहेत. ही छोटी-छोटी कोडी आपल्या बुद्धीला ताण देतात. पण, व्यवस्थितपणे विचार करून ती सोडवल्यास कठीण नाहीत. कोडी ही बुद्धीला ताण देण्यासाठी असतात, असे आपल्याकडे बोलले जाते. पण, या पुस्तकातील कोडी ही अतिशय सोप्या भाषेतील असल्याने ती सहज सोडवता येऊ शकतात.

कपिले यांचे दुसरे पुस्तक आहे. कोडी झाली नाटुकली. नाटय़मय पद्धतीने कोडी कशी सोडवता येऊ शकतात, हे त्यांनी या पुस्तकातून दाखवून दिलेले आहे. कोडी सोडवण्याची मजा घ्यायची असेल, तर ही दोन्ही पुस्तके आपल्या संग्रही हवीत. ही दोन्ही पुस्तके जे. के. मीडिया या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version