Home देश केजरीवाल निवडणूक आयोग सदनात दाखल

केजरीवाल निवडणूक आयोग सदनात दाखल

0

सोमवारी आपल्या पक्षाला निवडणूक आयोगाचा अधिकृत दर्जा मिळावा यासाठी निवडणूक सदनात सोमवारी हजर झाले.

नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल यांनी गेल्या आठवड्यात आम आदमी पार्टीची (एएपी) घोषणा केली. त्यानंतर सोमवारी आपल्या पक्षाला निवडणूक आयोगाचा अधिकृत दर्जा मिळावा यासाठी निवडणूक सदनात सोमवारी हजर झाले.

एएपीचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी पक्षस्थापने संदर्भातले सर्व दस्तावेज निवडणूक आयोगाला सादर केले. पक्षाला अधिकृत दर्जा मिळण्यासाठी आणखीन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल असे गुप्ता यांनी सांगितले.पुढील वर्षी दिल्लीत होणा-या निवडणूकीपूर्वी पक्षाला बोधचिन्ह मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टीम अण्णातून फारकत घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी २६ नोव्हेंबरला आम आदमी पार्टीची अधिकृत घोषणा केली होती. भ्रष्ट्राचाराच्या मुद्दयावर लढण्यासाठी पक्ष स्थापनेची गरज असल्याचं मत त्यांनी टीम अण्णामध्ये असताना व्यक्त केले होते.

[EPSB]

पक्ष स्थापला, पण..

सध्या केजरीवाल यांचा ‘आम आदमी पार्टी’ हा राजकीय पक्ष चर्चेत आहे. केजरीवाल यांना बुद्धिमान, नि:स्वार्थी, प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र अनेक जण देत आहेत, ते तसे असतीलही. पण ते जी भूमिका घेऊन राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत ती कितपत व्यवहार्य ठरेल याबाबत शंकाच आहे. पक्षस्थापनेची घोषणा करतानाची विधाने पाहता त्यांना सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवायचे आहेत की सवंग लोकप्रियता […]

 

‘आम आदमी पार्टी’ची अधिकृत घोषणा

सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाची सोमवारी अधिकृत घोषणा करण्यात आली.

 

 

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version