Home टॉप स्टोरी कायदा मान्य नाही, पाकिस्तानात निघून जा

कायदा मान्य नाही, पाकिस्तानात निघून जा

0

देशातील ज्या लोकांना भारतीय व्यवस्था, न्यायालयाबद्दल आदर नसेल त्यांनी पाकिस्तानात निघून जावे त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत असे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली – देशातील ज्या लोकांना भारतीय व्यवस्था, न्यायालयाबद्दल आदर नसेल त्यांनी पाकिस्तानात निघून जावे त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत असे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

एमआयएमच्या असाउद्दीन ओवेसीवर टीका करताना साक्षी महाराज यांनी दुस-यांदा अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

असाउद्दीन ओवेसीने मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनचा बचाव करताना त्याच्या फाशीच्या शिक्षेला विरोध केला होता.

त्यावरुन ओवेसीवर टीका करताना साक्षी महाराज यांनी भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आदर नसेल त्यांनी पाकिस्तानात निघून जावे असे विधान केले. साक्षी महाराज यांच्या विधानांनी भाजपाला यापूर्वीही अडचणीत आणले आहे.

याकूब मेमनने शरणागती पत्करली आहे त्याला अटक झालेली नाही. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे मेमनने सिध्द केले आहे मग त्याला फाशीची शिक्षा का ? असा सवाल असाउद्दीन ओवेसीने उपस्थित केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version