Home टॉप स्टोरी कांदा चालला ८० रुपये किलो

कांदा चालला ८० रुपये किलो

0

कांद्याच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांना घाम फुटण्याची वेळ आली आहे. लासलगावच्या बाजारात घाऊक बाजारात कांद्याला ६३२६ रुपये क्विंटल भाव मिळाला. 

नाशिक – कांद्याच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांना घाम फुटण्याची वेळ आली आहे. लासलगावच्या बाजारात घाऊक बाजारात कांद्याला ६३२६ रुपये क्विंटल भाव मिळाला. यामुळे किरकोळ बाजारात कांद्याच्या भावाची वाटचाल आता ८० रुपये किलोपर्यंत चालली आहे.

लासलगाव एपीएमसीने सांगितले की, दुपारी एक वाजेपर्यंत कांद्याचे भाव क्विंटलमागे ५७०० रुपये होते. मात्र, पिंपळगाव बसवंत एपीएमसीत क्विंटलचा भाव ६३१८ रुपये मिळाला. जिल्ह्यातील अन्य एपीएमसी बाजारातही कांद्याचे वाढ वाढत आहेत.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत कांद्याचा दर ७० ते ८० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे अनेक घरांतून कांदा हद्दपार झाला आहे. तसेच अनेक हॉटेल्स व रस्त्यावरच्या गाडय़ांवरूनही कांदाभजी नाहीशी झाली आहे.

कांद्याच्या निर्यात दरात वाढ
कांद्याच्या निर्यात दरात केंद्र सरकारने शनिवारी वाढ केली आहे. कांद्याचे किमान निर्यात मूल्य टनामागे ४२५ डॉलर्सवरून ७०० डॉलर्सवर नेले आहे. देशात कांदाचा साठा मोठय़ा प्रमाणात राहावा, म्हणून केंद्राने तातडीने हे पाऊल उचलले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version