Home टॉप स्टोरी मुख्यमंत्रीपदी मल्लिकार्जुन खर्गे ?

मुख्यमंत्रीपदी मल्लिकार्जुन खर्गे ?

0
संग्रहित छायाचित्र

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि केंद्रीय कामगार मंत्री मल्लिकार्जुन खर्गे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

नवी दिल्ली – कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार असल्याते स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि केंद्रीय कामगार मंत्री मल्लिकार्जुन खर्गे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. मी जातीने दलित आहे किंवा ब-याच काळपासून पक्षाक्षी एकनिष्ठ आहे म्हणून मला मुख्यमंत्रीपद नको आहे. जर पक्ष नेतृत्वाला मी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य वाटतो. तर त्यांनी निर्णय घ्यावा. हायकमांडच्या कुठल्याही निर्णयाचे पालन करण्यास मी बांधील आहे असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

खर्गे कर्नाटकातील काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते आहेत. २००९ मध्ये ते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते होते. त्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार लोकसभेची नि्वडणूक लढवून ते खासदार म्हणून केंद्रात गेले.

मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार सिध्दरामय्या यांना पाठिंबा देणार का ? या प्रश्नावर खर्गे म्हणाले कि, काँग्रेस पक्षात प्रत्येकामध्ये जबाबदारी संभाळण्याची क्षमता आहे. हायकमांडकडून ज्यांची निवड होईल त्यांना पाठिंबा देऊ असे सांगितले. सिध्दरामय्या धर्मनिरपेक्ष जनता दलातून काँग्रेसमध्ये आले आहेत. ही बाब त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी अडचणीची ठरु शकते. त्यामुळे सिध्दरामय्या यांच्या नावाचा पहिला विचार होण्याची शक्यता कमी आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version