Home महामुंबई ठाणे कर्जत-नेरळ-माथेरान मिनीबसच्या फे-या वाढवाव्यात

कर्जत-नेरळ-माथेरान मिनीबसच्या फे-या वाढवाव्यात

0

कर्जत-नेरळ-माथेरान अशी एसटीची मिनीबससेवा पावसाळ्यात अनेकदा कोलमडून पडते. 
नेरळ – कर्जत-नेरळ-माथेरान अशी एसटीची मिनीबससेवा पावसाळ्यात अनेकदा कोलमडून पडते. अनेक वेळा मिनीबस रद्द होत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे येथील बसच्या फे-या वाढवाव्यात, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

माथेरानमधील विद्यार्थी शिक्षणासाठी नेरळ आणि कर्जत येथे जातात. पावसाळ्यात माथेरान-नेरळ घाटात मोठया प्रमाणात धुके असते. तसेच घाटरस्त्याच्या कडेला शेवाळे तयार झाल्याने रस्ता निसरडा झालेला असतो. या घाटामध्ये मिनीबस जात असताना इंजिनावर भार पडत असल्याने दररोज मिनीबसच्या दुरुस्तीचे काम करावे लागते. त्यामुळे मिनीबस वेळेवर कर्जत येथून सुटत नाहीत. त्यातच मिनीबसमध्ये मोठा बिघाड झाल्यास बस रद्द करण्यात येते.

यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यास उशीर होतो. मागील १५ दिवस मिनीबसची एकच बस सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी टॅक्सी किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पासधारक विद्यार्थ्यांची होणारी गेरसोय टाळण्यासाठी एसटी मंडळाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी खेडकर यांनी केली आहे.

उन्हाळ्यात ज्या नवीन मिनीबस माथेरांसाठी येणे अपेक्षित होते, त्या वेळेवर उपलब्ध न होऊ शकल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मात्र आता विद्यार्थी ज्या वेळेत शाळा किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी स्टॅण्डवर येतात, त्या वेळी मिनीबस सुरू ठेवली जाईल. – दीपक घोडे, आगारप्रमुख, कर्जत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version