Home महामुंबई ठाणे कर्जतमधील १४ गावे आणि ३४ वाडयांमध्ये पाणीटंचाई

कर्जतमधील १४ गावे आणि ३४ वाडयांमध्ये पाणीटंचाई

0

कर्जत तालुक्यात मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाई जास्त जाणवत आहे. 

नेरळ- कर्जत तालुक्यात मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाई जास्त जाणवत आहे. यावर्षी शासनाच्या कृती आराखडयात १४ गावे आणि ३४ आदिवासी पाडयांचा समावेश करण्यात आला असून त्यांची टंचाई दूर करण्यासाठी टँकर आणि बैलगाडयांनी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

कर्जत तालुक्याचा अर्धा भाग आदिवासी आणि दुर्गम भागात वसला आहे. त्यात तालुक्यातून वाहणा-या नद्या उन्हाळ्यात कोरडया असतात. तालुक्यातील मोठी लोकवस्ती ही दुर्गम भागात वसली असल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावते.

ही टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात एप्रिल २०१६ पासून १४ गावे आणि ३४ आदिवासी वाडयांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मागील ही संख्या १० गावे आणि ३१ आदिवासी वाडया इतकी होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version