Home टॉप स्टोरी कन्हैया कुमारचा जामीन मंजूर

कन्हैया कुमारचा जामीन मंजूर

0

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्हैया कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. 

नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशाविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्हैया कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कन्हैयाच्या जामिनावर निर्णय राखून ठेवला होता. मात्र बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कन्हैयाला १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

कन्हैया कुमारला जामीन म्हणजे हा दिल्ली पोलिसांसाठी मोठा झटका आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत कन्हैया विरोधात देशविरोधी घोषणा दिल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याची कबुली दिल्ली पोलिसांनी दिली होती. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना देशद्रोहाच्या आरोपाचा अर्थ कळतो का?, असा प्रश्न केला होता.

दोन आठवडयापूर्वी दिल्ली पोलिसांनी कन्हैयाला देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. कन्हैया जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता आहे. पतियाळा हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीत कन्हैयाला मारहाणही झाली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version