Home टॉप स्टोरी एसटी कर्मचा-यांचा मोर्चा

एसटी कर्मचा-यांचा मोर्चा

0
मोर्च्यात लाखो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते.छाया - मंगेश सौंदाळकर

एसटी कर्मचा-यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने’ने शुक्रवारी मुंबई सेंट्रल ते आझाद मैदान असा मोर्चा काढला.

मुंबई – एसटी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने’ने अध्यक्ष अजित अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मुंबई सेंट्रल ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. या मोर्चात लाखो कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी, सहाव्या वेतन श्रेणीनुसार ४० टक्के ग्रेड पे देण्यात यावे, टोल टॅक्स रद्द करावा आणि १७.५ टक्के प्रवासी कर रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या मोर्चाला मुंबई सेंट्रल बस डेपोतून सुरुवात झाली. या मोर्चासाठी मुंबई सेंट्रल ते आझाद मैदान हा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. त्याशिवाय सकाळी मुंबई सेंट्रल डेपो पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे डेपोतून एकही गाडी धावली नाही. कर्मचा-यांच्या मागण्या रास्त असल्यातरी या मोर्चामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.

दरम्यान, राज्य शासनाने मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी दिलेली नाही. पण तरीही हा मोर्चा काढण्यात आला आहे. आझाद मैदानात मनसे आमदार बाळा नांदगावकर, राम कदम यांची सभा होणार आहे.  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version