Home देश एसएमएसने मिळणार मतदान केंद्राची माहिती

एसएमएसने मिळणार मतदान केंद्राची माहिती

0

देशातील १४ राज्यातील मतदारांना एसएमएसने मतदान केंद्राची माहिती देणारा उपक्रम निवडणूक आयोगाने सुरू केला आहे. 
नवी दिल्ली- देशातील १४ राज्यातील मतदारांना एसएमएसने मतदान केंद्राची माहिती देणारा उपक्रम निवडणूक आयोगाने सुरू केला आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत उपलब्ध आहे.

इच्छुक मतदारांनी नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, राहण्याचे ठिकाण, जन्म दिनांक, लिंग आदींचा तपशील ह्लएउकह्व शब्द टाइप करून एसएमएस पाठवावा. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना एसएमएसमधून मतदान केंद्राची माहिती मिळू शकेल.

अरुणाचल प्रदेश, दादरा-नागरा-हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, नागालॅँड, पॉँडेचेरी, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. ही सेवा लवकरच अन्य राज्यांतही सुरू होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version