Home देश एमएसजीला सेन्सॉर बोर्डाची परवानगी

एमएसजीला सेन्सॉर बोर्डाची परवानगी

0

अनेक वादविवादानंतर डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांच्या ‘एमएसजी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली – अनेक वादविवादानंतर डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांच्या ‘एमएसजी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारीला प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे.

स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राम रहीम यांनी ट्विटवरुन शनिवारी रात्री ही माहिती दिली. मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली आहे. चित्रपटाचे नवे नाव एमएसजी : द मेसेंजर आहे.

यापूर्वी या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देण्यावरुन अनेक वाद झाले होते. राम रहिम यांनी सिनेमात स्वत:ला देव म्हणून सादर केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप नोंदवत परवानगी नाकारली होती. मात्र एफसीएटीकडून या चित्रपटाला परस्पर मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सेन्सॉर मंडळाच्या अध्यक्ष लीला सॅमसन तसेच अन्य सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.

यासोबतच पंजाब आणि हरयाणामधील अनेक संघटनांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. मात्र पंजाब आणि हरयाणा न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यास नकार दिला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version