Home देश एफडीआयच्या निर्णयाला मायावतींचा नकार

एफडीआयच्या निर्णयाला मायावतींचा नकार

0

रिटेलमध्ये थेट परकीय गुंतवणूकीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलण्यास बहुजन समाज पक्षाच्या  (बसप) अध्यक्ष मायावती यांनी नकार दिला आहे.

नवी दिल्ली – रिटेलमध्ये थेट परकीय गुंतवणूकीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलण्यास बहुजन समाज पक्षाच्या  (बसप) अध्यक्ष मायावती यांनी नकार दिला आहे. रिटेलमधील एफडीआयचा फायदा – तोटा लक्षात घेऊन आम्ही आमची भूमिका लोकसभेत स्पष्ट करू, असे मायावती यांनी सांगितले.

मायावती यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन रिटेलमधील एफडीआय बाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली. परकीय गुंतवणूक देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. मात्र एफडीआयबाबत सरकारने घाईगडबडीत निर्णय घेऊ नये. यामुळे छोट्या व्यापा-यांचे नुकसान होणार आहे. शेतक-यांना एफडीआयमुळे खूप काही लाभ होईल असे वाटत नाही. दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई कमी होईल असेही वाटत नाही. त्यामुळे सध्यातरी बहुजन समाज पक्ष एफडीआयचे समर्थन करत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एफडीआयच्या मुद्द्यावर मंगळवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. त्यानंतर या मुद्द्यावर मतदान होण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version