Home देश एप्रिलच्या दुस-या आठवडयात लोकसभेचा रणसंग्राम ?

एप्रिलच्या दुस-या आठवडयात लोकसभेचा रणसंग्राम ?

0

निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या दुस-या आठवडयापासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा निवडणूकीसाठी कुठल्याही दिवशी अचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी विकासकामाच्या उदघाटनाचा धडाका लावला आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या दुस-या आठवडयापासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे.

७ ते १० एप्रिलदरम्यान पहिल्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकते. यंदा प्रथमच सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीची २००९ ची लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये झाली होती.

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, या आठवडयातच लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. संवेदनशील नक्षलग्रस्त भागांमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान होऊ शकते. आंध्रप्रदेश, नव्या अस्तित्वात आलेल्या तेलंगणमध्ये लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणूका होऊ शकतात. लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण देशभरात आठ लाख मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version