Home टॉप स्टोरी एका तरी मंत्र्याला घरी पाठवू

एका तरी मंत्र्याला घरी पाठवू

0

पायंडय़ांवर न बसण्याची नारायण राणे यांची सूचना चांगली आहे. लोकसभेतही काही वेळा आम्हाला महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाजवळ उभे राहावे लागते. पण आता आक्रमकपणे सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे. 

मुंबई – फडणवीस सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या गाळात रुतले आहेत. त्या मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढून विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करू आणि भ्रष्ट असलेल्या मंत्र्यांपैकी एकाला तरी घरी पाठवू, असा निर्धार विधानसभा आणि विधान परिषदेतील काँग्रेस आमदारांच्या बैठकीत बुधवारी व्यक्त करण्यात आला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते. याशिवाय दोन्ही सभागृहांतील काँग्रेस आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूर्ण ताकदीने प्रश्न लावून धरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सभागृहात आपण विरोधी पक्षात आहोत, याचा न्यूनगंड न बाळगता संपूर्ण अधिवेशनभर पूर्ण संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त करा, असे श्री. नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, भरपूर विषय उपलब्ध आहेत. सरकारचे अपयश सर्वत्र दिसते आहे. भीषण दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई?आहे. सरकारचे मंत्री नुसते दौरे करीत आहेत. निर्णय होत नाहीत. चारा नाही. बेरोजगारी वाढते आहे. या स्थितीत विरोधी पक्षाजवळ भरपूर दारूगोळा आहे.

श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक मंत्र्याची प्रकरणे समोर आलेली आहेत. कोणा मंत्र्याच्या पी. ए. ने मारहाण केलेली आहे. काही मंत्री अनेक प्रकरणांत अडकले आहेत. माहिती कायद्याच्या अधिकारात पूर्ण माहिती मिळवून पुराव्यासह या सरकारवर तुटून पडले पाहिजे. आपण आरोप करायला लागल्यावर ते खटले भरतील. माझ्यावरही खटला भरला तर आपण खटले भरण्याची तयारी ठेवली पाहिजे.

श्री. अशोक चव्हाण यांनी सांगितले की, दुष्काळातील मंत्र्यांचे दौरे फोटोसाठी आहेत. प्रत्यक्षात जनावरे तडफडत आहेत. सात-सात दिवस पिण्याचे पाणी नाही. रोजगार हमीवर कामे नाहीत. या स्थितीत राष्ट्रवादीशी चर्चा?करून एकत्रितपणे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण लढणार आहोत.
श्री. अशोक चव्हाण यांनी पुढे सांगितले की, विधान परिषदेत राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदी आहे आणि विधानसभेतही त्यांचे संख्याबळ आहे. सरकारच्या विरोधात काम करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे हल्ला चढवावा, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक झाली.

या बैठकीत दोन्ही सभागृहांत एकत्रितपणे हल्ला करावा, याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार उद्यापासून सभागृहात काय होते ते पाहू या.
पायंडय़ांवर न बसण्याची नारायण राणे यांची सूचना चांगली आहे. लोकसभेतही काही वेळा आम्हाला महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाजवळ उभे राहावे लागते. पण आता आक्रमकपणे सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे.

काँग्रेसचे प्रभारी श्री. मोहन प्रकाश म्हणाले की, लोकसभेमध्ये काँग्रेसच्या बाकावर ४४ खासदार आहेत. पण त्यापैकी ज्येष्ठ खासदार सोडले तर
दहा-पंधरा खासदारच सभागृहात आक्रमक असतात. पण तरीही या खासदारांनी सरकारचे टाके ढिले केले आहेत. महाराष्ट्र विधानसभेतही आमदारांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, आपल्या नेत्यांना खोटय़ा आरोपात बदनाम करण्याचे काम सुरू?आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभेतील आमदार या सरकारला रोखण्याचे काम करणार की नाही, असाही सवाल मोहन प्रकाश यांनी विचारला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version