Home व्यक्तिविशेष एकनाथजी रानडे

एकनाथजी रानडे

0

कन्याकुमारीच्या ‘स्वामी स्मारका’चे शिल्पकार एकनाथजी रानडे यांचा आज स्मृतिदिन. अमरावती जिल्ह्यातील तिमताला येथे दि. १९ नोव्हेंबर १९१४ रोजी जन्मलेला हा एकनिष्ठ संघ स्वयंसेवक. नागपूर विद्यापीठातून तत्त्वज्ञानातील एम. ए. व सागर विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केलेल्या एकनाथजींनी शालेय जीवनापासूनच डॉ. हेडगेवारांचा सहवास लाभला होता. त्यांच्याच प्रभावामुळे ‘स्वयंसेवक’ बनलेल्या एकनाथजींनी पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक पदही भूषवले. सन १९६३ मध्ये स्वामी विवेकानंदाच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी ‘राऊजिंग कॉल टू हिंदू नेशन’ हा ग्रंथ संकलित केला आणि लगेचच क न्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाची कार्यधुरा उचलली. एकनाथजींच्या अथक परिश्रमामुळे आणि कल्पकता, चिकाटी आणि संघटना कौशल्यामुळेच ते भव्य स्वप्न सत्यात उतरून आज हिंदी महासागरात दिमाखाने उभे आहे. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत अशा बलवादी भारताची उभारणी त्याग आणि सेवा यांच्या आधारेच घडवावी म्हणून एकनाथजींनी ते सा-या राष्ट्राला मार्गदर्शक ठरावे असे ‘विवेकानंद केंद्र’ – अशा या एकनाथजींनी दि. २२ ऑगस्ट १९८२ रोजी अखेरचा स्वास घेतला. आज त्यांचा स्मृतिदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version