Home आनंदमंत्र उत्सवी सौंदर्यासाठी..

उत्सवी सौंदर्यासाठी..

0

‘हिरोपंती’ हा चित्रपट खूप गाजला. त्यातली अभिनेत्री क्रीती सनॉन तिच्या दिसण्यामुळे आणि लांब, सुंदर, मुलायम केसांमुळे लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. दिवाळीसारखा मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासुदीच्या दिवसांत आपणही छान सुंदर दिसायला हवं असं प्रत्येकीलाच वाटतं. त्यासाठी महिला आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी भरपूर पैसे खर्च करत असतात. म्हणूनच आपल्या सौंदर्यामुळे लोकांच्या लक्षात राहिलेल्या क्रीती सनॉनने काही सौंदर्य टिप्स दिल्या आहेत.

 तेजस्वी त्वचा

तुम्ही दररोज तुमच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर तुमची त्वचा खराब होईल. म्हणजे तुम्हाला डेड स्कीनसारख्या समस्या उद्भवू शकतील, म्हणूनच तुम्ही योग्य ते डाएट करून त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी त्वचेला दररोज मॉइश्चर लावलंत तर तुमच्या त्वचेची निगा राखता येईल.

पार्टी मेकअप

सुंदर दिसायचं असेल तर मेकअप करायलाच हवा. चांगला मेकअप हवा असेल तर तुम्ही प्रथम डोळ्यांना आयशॉडो लावून घ्या. खूप साऱ्या शेड्स लावू नका केवळ एकाच रंगाचा वापर करा. मग तो रंग कोणताही असेल. उदा. मेटालिक ब्लू, जांभळा किंवा हिरवा. यापैकी कोणताही रंग लॅश लाइनला लावा. तुम्हाला अगदी गडद रंग आवडत नसेल तर जरा पुसट करा. पण जितकं साधं ठेवता येईल तितके ते साधे ठेवा.

केस

तुमचा ड्रेस अगदी साधा-सुधा असले तरीदेखील छानशा हेअरस्टाइलने त्याचा लुक बदलतो. कारण तुमच्या दिसण्यात तुमचे केस खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येकीला आपले केस चांगले दिसावेत असं वाटत असतं. केस चांगले निरोगी राहण्यासाठी खोबरेल तेल हा अतिशय उत्तम पर्याय आहे. कारण ते तुमच्या केसांना कंडिशनिंग करतं. तेव्हा आठवडयातून दोन वेळा केसांना तेलाने मॉलिश करा आणि किमान रात्रभर तेल केसांना ठेवा. पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड जास्मीन या तेलामुळे तुम्हाला अधिक चमक मिळतेच याशिवाय पोषणही मिळतं. तेव्हा आता केसांच्या समस्येला बाय बाय करा आणि या सणाच्या दिवसांत तुमचे चमकदार केस मिळवा.

ओठांची चकाकी

तुमचं वय किती आहे, हे मला शोभेल का याचा विचार करू नका. तुमच्या ओठांना अगदी बिनधास्त लिपस्टिक लावा. त्याअगोदर फिक्या रंगाच्या लिप पेन्सिलने प्रथम लाइन काढून घ्या. ओठांच्या टोकांना थोडं मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने मऊ लिपस्टिक लावा. त्यानंतर त्यावर लिप ग्लॉस लावा. ओठांना आणखी चमकदार बनवण्यासाठी थोड अधिक ग्लॉस लावा.

थकलेले डोळे

सतत नाइट पार्टीजमुळे कितीही नाही म्हटलं तरीही डोळे थकतात. ताजेतवाने दिसण्यासाठी डोळ्यांना थोडा मसाज द्या म्हणजे अपु-या झोपेमुळे दिसणारे सुजलेले डोळे पूर्ववत होतील. कोल्ड टी बॅग डोळ्यांवर ठेवल्यामुळे तुमच्या डोळ्यांना नक्कीच आराम मिळेल.

प्रदूषण टाळा

आपल्याला सगळ्यांनाच फटाके फोडायला आवडतात. मग हा फटाक्यांचा धूर केसांना डल किंवा कोरडे करू शकतो. म्हणूनच केसांना गरम तेलाने केलेला मसाज तुमच्या केसांचं सौंदर्य अबाधित ठेवू शकतो.

डाय करताना

नुसतं त्वचा चमकदार असून भागत नाही तर सूर्यप्रकाशातल्या वावरामुळे आपली त्वचा काहीशी रापते. पण या सणांच्या निमित्ताने हा राप किंवा हे डाग काढणंदेखील आवश्यक असतं. बेसनचा फेस पॅक हा टॅन काढण्यासाठी एक उत्तम फेस पॅक ठरू शकतो. थोडं बेसन घ्या त्यात एक चमचा दूध, लिंबाचा रस, आणि चार ते पाच बदामांची पावडर घालून त्यांचं एकत्रित मिश्रण करा. ही पेस्ट तुमच्या चेह-यावर लावा. अर्धा ते एक तास ही पेस्ट चेह-यावर तशीच ठेवा, थंड पाण्याने चेहरा धुवा. आता तुम्ही बाहेर पडायला तयार व्हाल. ही प्रक्रिया पुन्हा केल्यास तुमच्या त्वचेला चांगलाच तजेला येईल.

नियमित पाणी प्या

नियमित पाणी प्या असा सल्ला वारंवार दिला जातो. पण एक महत्त्वाची आणि नेहमीच दुर्लक्षित राहिलेली गोष्ट म्हणजे शरीराचं कार्य सुरळित ठेवण्यासाठी नियमित पाणी पिणं आवश्यक आहे. बाष्पीभवन किंवा घामामुळे आपल्या शरीरातील पाणी बाहेर पडत असतं. त्या पाण्याची जागा भरून काढणं आवश्यक असतं. अगदी पाणी नको असेल तर ज्युस प्यावा मात्र कोल्ड ड्रिंक नक्कीच टाळावं.

 ‘नॅचरल्स’ने नॅचरल लुक

दिवाळी म्हटलं की महिलांचा खरेदी करण्याचा आणि नटण्याचा सण. दिवाळी पूर्वी घरातली सगळी कामं आटपून त्या दिवाळीच्या दिवशी छान नटून तयार असतात. प्रत्येकीला या सणात सुंदर दिसायचं असतं म्हणून नॅचरल्सच्या व्ही. कर्पागम्बिगई, राष्ट्रीय त्वचा प्रशिक्षक यांनी खास दिवाळीसाठी टिप्स दिल्या आहेत.

जितकं कमी तितकं चांगलं : चेह-यावरच्या फाइन लाइन्स लपवण्यासाठी सर्वप्रथम कन्सिलरचा उपयोग करावा. कोल पेन्सिल घेऊन डोळ्यांच्या आतल्या तसंच बाहेरील कडांना ठळक स्ट्रोक्स मारावेत. व्हॉल्युमिनिझिंग हा मस्करा लावावा, ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी न्युट्रल किंवा पिंक शेडची लिपस्टिक लावावी.

पारंपरिक साज : सणासुदीला पारंपरिक कपडे घालण्याकडे सगळ्यांचा कल असतो. आपल्या कपडय़ांना साजेसा मेकअप असणं आवश्यक आहे. कपडे झगमगीत असतील तर मेकअप साधा करावा आणि कपडे साधे असतील तर मेकअप उठावदार करावा. कोणत्याही कपडय़ांना शोभून दिसणारा न्युट्रल लुक द्यायचा असेल तर पापण्यांना सोनेरी रंग लावा आणि डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूला गडद तपकिरी रंग लावा. हो, पण तपकिरी रंग बाहेरील बाजूला झुकलेला दिसेल अशा प्रकारे लावा म्हणजे डोळ्यांचा आकार अधिक उठावदार दिसेल. वरच्या पापणीला विंग लायनर लावा आणि खालच्या पापणीला काजळाची गडद रेघ ओढा. आणखीन पारंपरिक लुक द्यायचा असेल तर छोटीशी टिकली लावा. सर्व लुक्सना मस्करा आणि फाउंडेशनची जोड द्यावी. एचडी फाउंडेशन आणि एअर ब्रशचा वापर करावा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version