Home देश इराणींच्या घरासमोर आप कार्यकर्त्यांची निदर्शने

इराणींच्या घरासमोर आप कार्यकर्त्यांची निदर्शने

0

स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करत आम आदमी पक्षाच्या ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली.

नवी दिल्ली – निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची शैक्षणिक माहिती दिल्याप्रकऱणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करत आम आदमी पक्षाच्या ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली.

सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांनी निदर्शनाला सुरुवात केली. यादरम्यान इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी लावून धरली.

इराणी यांना तात्काळ अटक केली पाहिजे तसेच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. तोमर यांना तात्काळ अटक करण्यात आली मग इराणींच्या प्रकरणात दिरंगाई का केली जात आहे? असा सवाल आपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बुधवारी इराणी यांच्या बनावट पदवी प्रकरणाची न्यायालयाने दखल घेत इराणी यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो असे स्पष्ट केले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version