Home टॉप स्टोरी इंटरनेटवरुन निवडणूक प्रचाराला चाप

इंटरनेटवरुन निवडणूक प्रचाराला चाप

0

राजकीय पक्षांना इंटरनेटवरुन निवडणूक प्रचार करण्यावर निवडणूक आयोगाने बंधने आणली आहेत. राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठी इंटरनेटचा गैरवापर करु देऊ नका असे निवडणूक आयोगाने इंटरनेट कंपन्यांना बजावले आहे.

नवी दिल्ली – राजकीय पक्षांना इंटरनेटवरुन निवडणूक प्रचार करण्यावर निवडणूक आयोगाने बंधने आणली आहेत. राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठी इंटरनेटचा गैरवापर करु देऊ नका असे निवडणूक आयोगाने इंटरनेट कंपन्यांना बजावले आहे.

इंटरनेट आणि मोबाईल असोशिएशन ऑफ इंडिया तसेचे सर्व प्रमुख सोशल नेटवर्कींग साईटसच्या अधिका-यांना निवडणूक आयोगाने पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून इंटरनेटवर जाहीरातीसाठी किती खर्च करण्यात आला याचा सर्व तपशील जेव्हा मागितला जाईल तेव्हा सादर करा असे आयोगाने बजावले आहे.

इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगवरुन निवडणूक प्रचाराच्या बाबतीत आम्ही अत्यंत गंभीर आहोत असे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे. इंटरनेट आणि इंटरनेट स्थीत मिडियाने निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठलीही राजकीय जाहीरात स्वीकारू नये असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

इंटरनेट स्थीत माध्यमांनी राजकीय आशय प्रसिध्द करताना त्यामुळे आदर्श अचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दखल घ्यावी असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक प्रचाराशी संबंधित ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या सोशल मिडियालाही लागू होत असल्याचे गेल्यावर्षीच ऑक्टोंबर महिन्यात निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडियावरील खात्यांची माहिती जमा करण्यास सांगितली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version