Home क्रीडा इंग्लंडने वनडे मालिका जिंकली

इंग्लंडने वनडे मालिका जिंकली

0

तिसरी आणि अंतिम लढत ४ विकेटनी जिंकत इंग्लंडने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका २-१ अशी जिंकली. 

चितगाव- तिसरी आणि अंतिम लढत ४ विकेटनी जिंकत इंग्लंडने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका २-१ अशी जिंकली. यजमानांचे २७८ धावांचे आव्हान पाहुण्यांनी सहा विकेटच्या बदल्यात १३ चेंडू राखून पार केले. इंग्लंडच्या आघाडी फळीने चांगले योगदान देत विजय सुकर केला.

जेम्स व्हिन्स (३२) आणि सॅम बिलिंग्जच्या (६२) झटपट ६३ धावांच्या सलामीनंतर बेन डकेट (६३) आणि बेन स्टोक्सच्या (नाबाद ४७) दमदार फलंदाजीमुळे पाहुण्यांना १३ चेंडू राखून जिंकता आले.

तत्पूर्वी, मुशफिकर रहिमसह (६७), सब्बीर रहमान (४९), इम्रुल कायेस (४६) आणि तमिम इक्बालच्या (४५) फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला ६ बाद २७७ धावा करता आल्या. इंग्लंडतर्फे अदिल रशिदने ४३ धावांत ४ विकेट घेत छाप पाडली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version