Home देश आसाम रायफल्सच्या तळाजवळ स्फोट, मुलगा ठार

आसाम रायफल्सच्या तळाजवळ स्फोट, मुलगा ठार

0
संग्रहित छायाचित्र

आसाम रायफलच्या तळाजवळ शनिवारी सकाळी झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात अकरा वर्षांचा मुलगा ठार झाला.

संग्रहित छायाचित्र

इंफाळ – लायलॉंग पोलिस स्टेशन आणि ४० आसाम रायफलच्या तळाजवळ शनिवारी सकाळी झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात अकरा वर्षांचा मुलगा ठार झाला.

ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या मार्गावरुन आसाम रायफल्सच्या जवानांचा नेहमीच प्रवास सुरु असतो. सुरक्षापथकांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी या ठिकाणी बॉम्ब पेरला होता असे पोलिसांनी सांगितले.

शनिवार दुपारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार दिवसांचा ईशान्येकडच्या राज्यांच्या दौरा सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील संवेदनशील भागांमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version