Home क्रीडा आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला सुवर्ण

आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला सुवर्ण

0

भारताचा गोळाफेकपटू इंदरजीत सिंग याने बुधवारी वुहान येथे सुरु असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णकामगिरी केली.

नवी दिल्ली – भारताचा गोळाफेकपटू इंदरजीत सिंग याने बुधवारी वुहान येथे सुरु असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णकामगिरी केली.

गोळाफेकमध्ये इंदरजीतने २०.४१ मीटरचे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर चीन तैपेईच्या चँग मिंग-हुआंगने १९.५६ मीटर आणि चीनच्या तियान झिंझोंगने १९.३५ मीटरचे अंतर नोंदवत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली

यापूर्वी गेल्या महिन्यात मंगळूरु येथे पार पडलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत इंदरजीतने सुवर्णपदक पटकावत २०१६ मधील रिओ ऑलिपिंकचे तिकीट निश्चित केले होते. तर २०१४ मध्ये दक्षिण कोरियातील इंचेऑन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत इंदरजीतने कांस्यपदक पटकावले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version