Home विदेश आर्यंलंड सरकार गर्भपाताचे नियम बदलणार

आर्यंलंड सरकार गर्भपाताचे नियम बदलणार

0

सविता हलप्पनवार हिच्या मृत्यूनंतर जाग आलेल्या आर्यंलंड सरकारने गर्भपाताच्या नियमांत बदल करण्याची तयारी दाखवली आहे.

डबलिन ( आर्यंलंड) – सविता हलप्पनवार हिच्या मृत्यूनंतर जाग आलेल्या आर्यंलंड सरकारने गर्भपाताच्या नियमांत बदल करण्याची तयारी दाखवली आहे.

२८ ऑक्टोबरला सविता हलप्पनवारचा वेळीच गर्भपात न केल्यामुळे मृत्यू ओढवला होता. सविताने डॉक्टरांना वारंवार सांगितले होते. मात्र गर्भपात करणे हे कँथलिक देश असल्यामुळे परवानगी देता येणार नाही या सबबीखाली डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला होता.

या घटनेनंतर उशिरा शहाणपण आलेल्या आर्यंलंड सरकारने आता गर्भपात नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्यंलंडचे आरोग्यमंत्री जेम्स रिली यांनी तसे निर्देश दिले आहेत. या नव्या नियमांतर्गत पोटातील गर्भामुळे महिलेचं आरोग्य धोक्यात येत असेल तर त्यावेळी कायद्याच्या चौकटीत राहून त्या महिलेचे प्राण कसे वाचवता येतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे. आर्यंलंडचे पंतप्रधान इंडा केन्नी यांनीही यासंदर्भातील नियम सध्या कागदोपत्री असून येत्या ईस्टरपर्यंत त्याचे कायद्यात रुपांतर केले जातील असे सुतोवाच केले.

दरम्यान, युरोपियन मानवाधिकार न्यायालयाच्या दबावानंतर आर्यंलड सरकारने गर्भपाताचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गर्भामुळे महिलेचा जीव धोक्यात असेल तर त्यावेळी गर्भपात करण्यास परवानगी दिली पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

[EPSB]

धार्मिक रुढींचा बळी

युरोपमध्ये आजही आर्यलडसारख्या काही देशांनी धार्मिक चौकटीतील पोलादी भिंतींमध्ये गर्भपाताला परवानगी नाकारलेली आहे. अमेरिकेतही बराक ओबामा दुस-यांदा अध्यक्षपदाच्या गादीवर विराजमान झाले. त्यांच्या प्रचारातील अनेक मुद्दय़ांपैकी गर्भपात हा महिलांचा अधिकार असावा, हाही एक होता. आर्यलडमध्ये सविता हलप्पनवार या ३१ वर्षीय दंतरोग चिकित्सक भारतीय महिलेचा वेळीच गर्भपात न केल्यामुळे मृत्यू झाला. गर्भपाताला मान्यता नसलेल्या समाजाने तिचा बळी […]

 

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version