Home टॉप स्टोरी माझ्याबाबत सरकारच निर्णय घेईल

माझ्याबाबत सरकारच निर्णय घेईल

0

माझ्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते माझे सरकारच ठरवेल, असे केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शिद यांनी सांगितले.

नवी दिल्ली- माझ्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते माझे सरकारच ठरवेल, असे केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शिद यांनी रविवारी नवी दिल्ली येथे ठामपणे सांगितले. तसेच आपल्यावर केलेल्या आरोपांना पुराव्यांसह प्रत्युत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांनी केलेले सर्व आरोप केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी रविवारी फेटाळून लावले. पत्रकार परिषद घेऊन खुर्शीद आणि त्यांची पत्नी लुईस यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे व छायाचित्रे सादर केली आणि आरोप करणा-यांची तोंडे बंद केली. खुर्शीद व त्यांची पत्नी चालवत असलेल्या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचे आरोप अरविंद केजरीवाल व त्यांच्या समर्थकांनी केले होते.

अपंगांना उपयुक्त उपकरणांचे वाटप करण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरांची माहिती खुर्शीद यांनी सादर केलेल्या कागदपत्रे आणि छायाचित्रांमध्ये या ट्रस्टच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची अनियमितता नसून, ७१ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही अधिकारप्राप्त आयोगाकडून किंवा समितीकडून होणाऱ्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व
प्रकारासाठी कोण जबाबदार आहे, ते या चौकशीतून बाहेर आले पाहिजे. मात्र, त्यात ‘इंडिया टूडे’ या समूहाच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. या आरोपांवरून राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले.

लंडनला गेलेले खुर्शिद आणि त्यांची पत्नी लुईस यांच्यावर एक वृत्तवाहिनी आणि ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. खुर्शिद यांच्या मालकीच्या झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टमध्ये गैरव्यवहार झाल्याचा केजरीवाल यांचा आरोप आहे. याबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या अहवालाचा दाखला देत अपंग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिरे न घेताच सरकारी निधी लाटल्याचा आरोप करत केजरीवाल यांनी खुर्शिद यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

लंडनला गेलेले खुर्शिद रविवारी सकाळी दिल्ली येथे परतले. यावेळी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे अरविंद केजरीवाल यांच्यासह सात कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर आणि काही कार्यकर्त्यांनी निवासस्थानी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.

दरम्यान, योग्य त्या सर्व पुराव्यांसह माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देणार असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना खुर्शिद यांनी सांगितले. तसेच कॅगसह कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास  तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खुर्शीद यांनी आपल्या संस्थेवर केलेल्या आरोपांचा स्पष्ट इन्कार केला. तसेच केजरीवालसारख्या माणसांच्या प्रश्नांना उत्तरे देणार नाही. हे आरोप खोटे असल्याचे या पुराव्यांद्वारे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

खुर्शीद यांनी त्यांच्या संस्थेद्वारे एटा, संतरविदास नगर, बुलंदशहर, अलाहाबाद, अलीगड, बरेली, इटावा, फर्रुखाबाद, कन्‍नौज, कांशीराम नगर, मैनपुरी, मेरठ, रामपुर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, शाहजहाँपुर येथे लावण्यात आलेल्या कॅम्पचा आढावा देत त्याबद्दलचे पुरावेदेखील पत्रकार परिषदेत सादर केले. याप्रकरणी लुईस आणि सलमान खुर्शीद यांनी अनेक ठिकाणी शिबिरे घेतल्याचा दावा करत त्याची छायाचित्रे सादर केली. खुर्शीद यांनी युपी सरकारमधील माजी सीडीओ जे.बी.सिंह त्यांच्या एका शिबिरात उपस्थित असल्याचे फोटोदेखील यावेळी पत्रकारांना दाखवले.

 [EPSB]

केजरीवालांचे आरोप काँग्रेसने फेटाळले

सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि उद्योजक रॉबर्ट वद्रा यांच्यावर केलेले आरोप काँग्रेसने मंगळवारी पुन्हा फेटाळून लावले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version