Home टॉप स्टोरी आरक्षणाचा नुसता गोंधळ

आरक्षणाचा नुसता गोंधळ

0

सरकारी नोक-यांमध्ये अनुसुचित जाती जमातींना आरक्षण देण्याच्या मागणीवरुन लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला.

नवी दिल्ली –  सरकारी नोक-यांमध्ये अनुसुचित जाती जमातींना आरक्षण देण्याच्या मागणीवरुन लोकसभेत सपाच्या नेत्यांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे काम गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले. याच मुद्दयावर लोकसभेत बुधवारी मतदान होणार होतं. मात्र विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्याने कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले . मात्र त्यानंतरही गदारोळ कायम राहिला. त्यामुळे आरक्षणाच्या विधेयकाला मंजूरी मिळू शकली नाही. राज्यसभेत आरक्षणाच्या विधेयकाला सोमवारीच हिरवा कंदील देण्यात आला आहे.

राज्यसभेत २४५ सदस्यांपैकी २१६ सदस्य उपस्थित होते. या २१६ जणांपैकी आरक्षणाच्या पारड्यात २०६ मतं  पडली तर १० मतं  विरोधात पडली. राज्यसभेतलं चित्र स्पष्ट झालं असलं तरी लोकसभेत आरक्षणाचे हे विधेयक मंजूर होणं थोडं मुश्किल वाटतं. कारण सपाच्या नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्दयाविरोधात मतदान केलं आहे. मात्र मायावतींनी या विधेयकाचे समर्थन केले आहे. त्यामुळे विधेयक पारित करण्यासाठी सरकारकडे फक्त दोन दिवसांचा अवधी आहे.

[EPSB]

बलात्कार प्रकरणी संसदेबाहेर निदर्शने

दिल्लीत भरधाव बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा बुधवारीही संसंदेत निषेध करण्यात आला.

 

 

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version