Home महाराष्ट्र आमदार नितेश राणे यांची किल्ले रायगडाला भेट

आमदार नितेश राणे यांची किल्ले रायगडाला भेट

0

किल्ले रायगडावर संपन्न होणा-या शिवराज्याभिषेक सोहळय़ाला युवा आमदार नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी भेट दिली.

महाड- किल्ले रायगडावर संपन्न होणा-या शिवराज्याभिषेक सोहळय़ाला युवा आमदार नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी भेट दिली. कोल्हापूर गादीचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी नितेश राणे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

त्यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमान संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रायगडावरील विविध पुरातन वास्तूंचीही त्यांनी पाहणी केली. होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळय़ाला नितेश यांनी अभिवादन केले.

किल्ले रायगडावर राजदरबार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील पुतळय़ालाही राणे यांनी अभिवादन केले. या दरम्यान मराठा आरक्षण समितीच्या विविध कार्यकर्ते व शिवप्रेमींशी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.

किल्ले रायगडच्या भेटीनंतर राणे यांनी महाडच्या चवदार तळ्यालाही भेट दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version