Home देश कुमार विश्वास आप सोडणार?

कुमार विश्वास आप सोडणार?

0

नवी दिल्लीमध्ये झालेल्या पराभवानंतर डळमळीत झालेल्या आम आदमी पक्षला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- नवी दिल्लीमध्ये झालेल्या पराभवानंतर डळमळीत झालेल्या आम आदमी पक्षला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. आपचे नेते कुमार विश्वास हे पक्षात राहणार की नाही याचा निर्णय बुधवारी होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासमोर कुमार विश्वास यांनी तीन अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य न झाल्यास कुमार विश्वास पक्षात राहतात की पक्षाला सोडचिठ्ठी देतात, यावर आज फैसला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणा-या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सुरूवातीला कुमार विश्वास पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीला जाणार नव्हते. म्हणून केजरीवाल यांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेट दिली.त्यांना बाहेर घेऊन गेले. कुमार विश्वास यांनी ठेवलेल्या तीन अटी या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे मान्य केल्यामुळे कुमार विश्वास या बैठकीला जाणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version