Home ऐसपैस आपला परिवार समाजातील विविध घटकांसाठी कार्यरत

आपला परिवार समाजातील विविध घटकांसाठी कार्यरत

0

समाजातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी घटकांसह आदिवासी, ग्रामीण भागातील आपल्या बांधवांचा सर्वागीण विकास व्हावा, हेच ध्येय नजरेसमोर ठेवून स्थापन झालेल्या ‘आपला परिवार’ या संस्थेने नुकतेच चतुर्थ वर्षात पदार्पण केले. 

समाजातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी घटकांसह आदिवासी, ग्रामीण भागातील आपल्या बांधवांचा सर्वागीण विकास व्हावा, हेच ध्येय नजरेसमोर ठेवून स्थापन झालेल्या ‘आपला परिवार’ या संस्थेने नुकतेच चतुर्थ वर्षात पदार्पण केले.

सुनील दामोदर कदम व प्रा. रमेश सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ट्रस्टने गेल्या चार वर्षात अनेक सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रम यशस्वीपणे राबवले. पहिल्याच वर्षी संस्थेने वसई तालुक्यातील गोरवीवरे येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्ताने फराळाचे वाटप केले. त्यानंतर विक्रमगड तालुक्यातील मोहे-खुर्द या गावी दहावी-बारावीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले.

या शिबिराचा २५०हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शहरातील विद्यार्थ्यांना विविध सुखसोयी उपलब्ध आहेत; परंतु ग्रामीण, दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुखसोयी उपलब्ध होण्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळेच संस्थेने ग्रामीण, आदिवासी भागात अधिक समाजाभिमुख कार्य करण्याचे ठरवलं आहे.

‘आपला परिवार’ संस्थेने आपल्या या छोटय़ाशा कार्यकाळात महिलांकरिता लालबाग महिला बचत गट व दहिसर महिला बचत गट स्थापन करण्यात पुढाकार घेतला. आज या बचत गटाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण झाली आहे. संस्थेतर्फे विक्रमगड तालुक्यातील आंबेघर व शेवता या जिल्हा परिषद शाळेतील १५०हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं तसंच आदिवासी महिलांना साडय़ांचं वाटप करण्यात आलं. तसंच गेल्या वर्षी संस्थेतर्फे १५ मार्च २०१५ रोजी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मोहे-खुर्द येथे आदिवासी शेतक-यांसाठी शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व तालुक्यातील आठ शेतक-यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत पादत्राणं वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई थेतले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या शेतकरी मेळाव्यात शेतक-यांना सेंद्रिय खताचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय संस्थेतर्फे ठाणे येथील वर्तकनगर येथे मोफत मधुमेह तपासणी शिबिर तसेच दापोली तालुक्यातील पाचवली गावात श्री स्वामी समर्थ मठ यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. २० डिसेंबर २०१५ रोजी संस्थेतर्फे लालबाग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात ४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.

संस्थेतर्फे समाजात विविध समस्यांवर जनजागृती व्हावी याकरिता सलग तीन वष्रे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली जात आहे. आतापर्यंत ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप कसे असावे’, ‘पाणी वाचवा, भविष्य वाचवा’ व ‘स्वच्छता’ या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच २०१५ मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छता’ विषयावर चित्रकला स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर संस्थेने १९ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या परळ स्टेशनवर ‘स्वच्छता मोहीम’ आयोजित केली होती.

‘आपला परिवार’तर्फे आजच्या युवा पिढीला करिअरविषयक मार्गदर्शन देण्याच्या संकल्पनेतून ‘बोला आपल्या तरुणाईसाठी’ (रस्रीं‘ो१ अस्र्’ं ४३ँ) हा अभिनव उपक्रम यंदापासून सुरू केला. २९ नोव्हेंबर २०१५ रोजी परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथील सभागृहात पहिले मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या उपक्रमातून युवकांसाठी युवकांकडूनच एक मंच बनवण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे.

थोडक्यात, गेल्या चार वर्षात विविध उपक्रम राबवून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेच्या विश्वस्त मंडळात अध्यक्ष रमेश सावंत, सचिव सुनील कदम, उपाध्यक्ष संजय कदम, सहचिटणीस अभिजीत कोल्रेकर, खजिनदार जीजी अम्ब्रे, कार्यकारी सदस्य दिलीप गवस, विजय िशदे, भास्कर कोल्रेकर, संजय तळेकर, निशिगंधा कुवळेकर, दीपाली परब यांचा समावेश आहे. संस्थेचे युवा व युवती असे दोन विभाग असून त्याचे प्रमुख म्हणून दीपक मोरे व प्रणाली राऊत काम पाहत असून दीडशेहून अधिक युवक-युवती संस्थेसाठी कार्यरत आहेत. संस्थेचा युवावर्गाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलामंचही आहे.

संस्थेच्या भविष्यातील उपक्रमाबद्दल बोलताना सचिव सुनील कदम म्हणाले की,भविष्यात विविध सामाजिक उपक्रम संस्थेला राबवायचे आहेत. ज्यात संगणक प्रशिक्षण केंद्र, समाज कल्याण केंद्र, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तसेच आदिवासी भागातील अतिदुर्गम भागात शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवायचे आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version