Home ताज्या घडामोडी आदित्य बिर्ला मेमोरियलला ‘स्वाभिमान’चा दणका

आदित्य बिर्ला मेमोरियलला ‘स्वाभिमान’चा दणका

0

गरीब रुग्णांना वंचित ठेवाल तर, रुग्णालयावर मोर्चा

मुंबई – आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे दिले नाही म्हणून रुग्णाला डांबून ठेवणे आणि रुग्णाच्या नातेवाइकांना धक्काबुकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाला आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वाभिमानच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेने चांगलाच दणका दिला आहे. गोरगरीब रुग्णांना शासकीय योजनेतून उपचार केले नाहीत तर रुग्णालयावर मोर्चा आणू असा इशाराच पिंपरी- चिंचवड संघटक हेमंत चव्हाण यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन स्वाभिमानतर्फे जिल्हाधिका-यांना दिले आहे.

दशरथ शिवाजी आरडे (७२, रा. कैलासनगर, पिंपरी) यांना अर्धागवायूचा झटका आल्याने त्यांना ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात दहा हजार रुपये भरले. आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दाखविले. तरीही रुग्णालयाने त्यांच्यावर मोफत उपचार केले नाहीत. उपचारानंतर त्यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र बिल न भरल्याने रुग्णालयाने त्यांना सोडलेले नाही.

तसेच त्यांचे औषध व जेवणही बंद केले. त्यांच्या नातेवाइकांनाही भेटू दिले नाही, बाऊन्सरकडून त्यांना धक्काबुकी करण्यात आली. ही गोष्ट आमदार नितेश राणे यांना समजताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिपरी चिंचवड शहर संघटक हेमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अशाप्रकारे कोणत्याही गरीब रुग्णाची छळवणूक होता कामा नये.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version