Home टॉप स्टोरी आदित्यच्या मागोमाग अमित ठाकरेही पक्ष कार्यात सक्रीय

आदित्यच्या मागोमाग अमित ठाकरेही पक्ष कार्यात सक्रीय

0

उद्धवपुत्राच्या सक्रीय राजकारणानंतर आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’मध्ये सक्रीय झाले आहेत.

मुंबई- शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये गेल्या तीनेक वर्षांपासून आदित्य ठाकरे यांनी चांगलीच पकड घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या चिरंजिवांना जाणीवपूर्वक राजकारणात सक्रीय केले आहे. उद्धवपुत्रांच्या सक्रीय राजकारणानंतर राजपुत्र तरी कसे शांत राहतील? त्यामुळेच की काय राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’मध्ये सक्रीय झाले आहेत.

अमित यांनी मुंबईत विभागवार बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मनसेतील जुने – नवे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ते बैठका घेत आहेत. निवडणुकांमधील सततच्या अपयशाने मानसिकदृष्ट्या खचलेल्या, पक्ष कार्यात सक्रीय नसलेल्या तळागाळातील मनसैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी अमित ठाकरे प्रयत्न करीत आहेत. नवख्या अमित ठाकरे यांच्यासोबतीला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासारखे पदाधिकारीही असतात.

याबाबत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अमितजी पक्ष कार्यासाठी भरपूर वेळ देऊ लागले आहेत. ते सक्रीय झाल्यामुळे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. मात्र आदित्य ठाकरेंकडे पाहून अमितजी पक्षात सक्रीय झालेत असे अजिबात म्हणता येणार नाही. तसे तर आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या हयातीतच सक्रीय झाले होते. अमितजी मात्र आता सक्रीय झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version