Home विज्ञान तंत्रज्ञान फेसबुकवर ‘ब्रेकिंग न्यूज’ साठी नवे अॅप

फेसबुकवर ‘ब्रेकिंग न्यूज’ साठी नवे अॅप

0

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने नेहमी आपल्या युझर्ससाठी नवनवीन फीचर्स उपलब्ध करुन दिले आहेत.

नवी दिल्ली- सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने नेहमी आपल्या युझर्ससाठी नवनवीन फीचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. आता फेसबुक ब्रेकिंग न्यूजसाठी आणखी एक नवीन अॅप सुरू करणार आहे.

या अॅपद्वारे फेसबुकवरुन युजर्सला ब्रेकिंग न्यूज समजणार आहे. युझर्ससाठी हे अॅप लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या अॅपची चाचणी सुरू आहे. ट्विटरवरील ‘न्यूज’ टॅब सारखेच हे नवे अॅप आहे.

युझईसला फेसबूकचे हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. यामध्ये एकूण शब्दांची मर्यादा १०० इतकी आहे. तसेच यावरही लिंकही देेण्याची सुविधा आहे.

याआधी फेसबूकवर फोटो, व्हिडीओ शेअर करता येऊ शकत होते. मात्र आता फेसबूकद्वारे युझर्सला ब्रेकिंग न्यूज मिळणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version