Home महामुंबई ‘आता खरा राडा सुरू होत आहे’

‘आता खरा राडा सुरू होत आहे’

0

काव्यसंग्रहाचे शनिवारी नारायण राणे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई – साहित्यिक मंगेश विश्वासराव यांच्या बहुचर्चित अशा ‘आता खरा राडा सुरू होत आहे’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता होणा-या प्रकाशन सोहळ्याला माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह कविवर्य अशोक बागवे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश तळेकर हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुमेरू प्रकाशनतर्फे श्रेणिक अन्नदाते यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नारायण राणे यांनी राजकारणाच्या क्षेत्रात खळबळ उडवून दिली, तर रविवार १ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या नव्या पक्षाची घोषणा करून आपले पुढचे मनसुबे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यानंतरच्या आठवडाभरातच ‘आता खरा राडा सुरू होत आहे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन खुद्द नारायण राणे यांच्या हस्ते आणि निलेश राणे व नितेश राणे यांच्या उपस्थितीत होत असल्याने साहित्य क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळातही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगेश विश्वासराव यांच्या ‘फलिर’, ‘मुख्यमंत्री’, ‘गोची’ या कादंब-या, तर ‘धारेला लागल्यानंतरच्या कविता’, ‘टणत्कार फुलांचा’, ‘उन्हाने वन्ही चेतवावा’ आणि ‘बिंदास बोध पत्रकारितेचा’ हे काव्यसंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version