Home देश आता ‘आधार’ मतदारयादीला जोडणार

आता ‘आधार’ मतदारयादीला जोडणार

0

भारतातील निवडणूक प्रक्रिया स्वच्छ करण्याचा भाग म्हणून मतदार यादीतील दोष दूर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत.

कोलकाता – भारतातील निवडणूक प्रक्रिया स्वच्छ करण्याचा भाग म्हणून मतदार यादीतील दोष दूर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. यासाठी मतदारयादीला ‘आधार’ कार्ड जोडण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी केली.

‘निवडणूक सुधारणा’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही मतदारयादी ‘आधार’ क्रमांकाला जोडण्याचे काम हाती घेतले आहे. यंदा हे काम नक्कीच पूर्ण होईल. ते झाल्यानंतर मतदारांची बायोमॅट्रिक माहिती असलेला भारत हा जगातील पहिलाच देश बनेल. त्यानंतर निवडणुकीच्या काळात कोणताही गैरव्यवहार होणार नाही, असा ठाम दावा त्यांनी केला.

मतदारयादीत आपले नाव दोन वेळा येणार नाही, याची काळजी मतदारांनी घ्यावी. एकाच मतदाराचे नाव दोनदा आढळल्यास त्यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. मतदारयादी आधारला जोडल्यानंतर मतदारांना आपला पत्ता ऑनलाईन कधीही बदलता येऊ शकतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version