Home महामुंबई आजपासून मुंबई विद्यापीठात २४ तासांचे फिल्म मॅरेथॉन

आजपासून मुंबई विद्यापीठात २४ तासांचे फिल्म मॅरेथॉन

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच २४ तासांच्या फिल्म मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच २४ तासांच्या फिल्म मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. एकापाठोपाठ एक सलग २४ तास, जगभरात गाजलेले विविध विषयांवरील ८ चित्रपट दाखवले जाणार आहेत.

यासाठी संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि फिल्म क्लबने यासाठी पुढाकार घेतला असून त्याचे उद्घाटन बुधवारी, १३ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी मल्टीपर्पज ऑडिटोरीअम येथे होणार आहे.

या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित राहणार असून समारोप कार्यक्रमाला चित्रपट निर्माते किरण शांताराम, विजय पाटकर आणि राकेश बापट उपस्थित राहणार आहेत.

बुधवारी सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध चित्रपट ‘लिंकन’ या चित्रपटाने या फिल्म मॅरेथॉनला सुरुवात होणार असून १४ एप्रिलला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाने या फिल्म मॅरेथॉनची सांगता होणार आहे.

सलग २४ तास चालणा-या या फिल्म मॅरेथॉनमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यावर आधारित आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी दिग्दर्शित केलेले ‘लिंकन’ शाम बेनेगल यांचा ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’, वेद राही यांनी दिग्दर्शित केलेला ‘वीर सावरकर’, जेम्स मार्श यांचा ‘द थेअरी ऑफ एव्हरीथिंग’, ओम राऊत यांचा ‘लोकमान्य’, रिचर्ड एटनबर्ग यांचा गाजलेला ‘गांधी’ चित्रपट, केतन मेहता यांचा ‘सरदार’, वॉल्टर सेल्स यांचा ‘मोटरसायकल डायरीज’ आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर-द अनटोल्ड ट्रूथ’ हे आठ चित्रपट दाखवले जाणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version