Home देश केजरीवालांना निवडणूक आयोगाची नोटीस

केजरीवालांना निवडणूक आयोगाची नोटीस

0

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली – भाजपाकडून पैसे घ्या आणि मत ‘आप’लाच द्या असे विधान करुन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या तीन दिवसांत केजरीवाल यांना दुस-यांदा नोटीस हजावण्यात आली आहे.

१८ जानेवारी रोजी उत्तम नगर येथील सभेत भाषणादरम्यान केजरीवाल यांनी निवडणुकीच्या काळात भाजपावाले तुम्हाला पैसे देऊ करतील. त्यासाठी नाही म्हणू नका ते पैसे घ्या आणि तुमचे मत मात्र ‘आप’लाच द्या असे विधान केले होते.

याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे केजरीवालांविरोधात विविध राजकीय पक्षांकडून तकारी आल्या आहेत. याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून गुरुवारी चार वाजेपर्यंत या नोटीशीवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

यापूर्वी १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी केजरीवालांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आजपर्यंत मुदत देण्यात आली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version