Home टॉप स्टोरी आगामी लोकसभा निवडणूकीचा खर्च ३० हजार कोटी?

आगामी लोकसभा निवडणूकीचा खर्च ३० हजार कोटी?

0

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सुमारे ३० हजार कोटीहूनही अधिक खर्च होण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आहे.

नवी दिल्ली – यावर्षीची निवडणूक ही भारतीय इतिहासातील सर्वात खर्चिक निवडणूक ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सुमारे ३० हजार कोटीहूनही अधिक खर्च होण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आहे.  संस्थेने केलेल्या अभ्यासानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये राजकीय पक्ष, सरकार आणि उमेदवार यांच्याकडून केल्या जाणा-या खर्चाचा समावेश आहे.

‘सेंटर फॉर मिडीया स्टडीजने’ केलेल्या सर्वेक्षणात करोडपती उमेदवार, कॉर्पोरेट जगत आणि कंत्राटदारांकडून निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जाईल असे आढळले आहे. आगामी निवडणुकीसाठी ३० हजार कोटींच्या खर्चापैकी सात ते आठ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी होईल. यापैकी साडेतीन हजार कोटी रुपये निवडणूक आयोगाकडून खर्च केली जाईल. यात नेमका किती खर्च होईल हे मतदान सुरु झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

यावर्षीच्या उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चात निवडणूक आयोगाने वाढ करुन ७० लाख इतकी ठेवली आहे. त्यामुळे उमेदवारांकडून चार हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असा अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. १९९६च्या निवडणूकीत दोन हजार ५०० कोटी रुपये इतका खर्च झाला होता. तर २००४ मध्ये हाच खर्च १० हजार कोटींपर्यंत पोहोचला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version