Home देश आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी राजीनामा देणार

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी राजीनामा देणार

0

केंद्र सरकारने मंगळवारी तेलंगण विधेयक लोकसभेत सादर केल्याने रेड्डी राजीनामा देण्याची शक्यता आहे.

हैदराबाद- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी राजीनामा देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मंगळवारी स्वतंत्र तेलंगण निर्मिती विधेयक लोकसभेत सादर केल्याने रेड्डी राजीनामा देण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून रेड्डी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

रेड्डी मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहन यांना भेटणार आहेत. त्यावेळी ते त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील असे समजते.

रेड्डी यांचा स्वतंत्र तेलंगण राज्यनिर्मितीला विरोध आहे. केंद्र सरकार मंगळवारी तेलंगण निर्मिती विधेयक लोकसभेत सादर करणार असल्याचे लक्षात आल्यामुळे रेड्डी यांनी रविवारी रात्रीपासूनच सीमांध्र व रायलसीमा भागातील काँग्रेस मंत्री, आमदार, विधान परिषद सदस्य आणि खासदारांशी चर्चा सुरू केली आहे.

या बैठकीनंतर रेड्डी हे राजीनामा देऊन नवीन पक्ष स्थापणार किंवा ते अन्य दुस-या पक्षात जाणार याबाबत काहीच माहिती नसल्याचे काही काँग्रेस मंत्र्यांनी सांगितले.

[EPSB]

तेलंगण विधेयक लोकसभेत सादर »

लोकसभेत सुरु असलेल्या प्रचंड गोंधळात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तेलंगण विधेयक सादर केले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version